आज 22 जणांना कोरोनाची बाधा : राहू, केडगाव, यवत, वरवंडसह ‛या’ 13 गावांचा समावेश



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असून हि कोरोना बाधितांची साखळी तोडण्यात अजूनतरी यश आलेले नाही.

दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज यवत कोविड सेंटरच्या अखत्यारीत असणाऱ्या गावांमधील सुमारे 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये एकूण 144 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती.

पॉझिटिव्ह आलेले गावे आणि रुग्ण हे केडगाव 2, यवत 2, सहजपुर 2, वरवंड 2, वाळकी 2, राहू 3, जावजीबुवांची वाडी 3, खुटबाव 1, देऊळगाव गाडा 1, नांदूर 1, कासुर्डी 1, बोरीऐंदी 1, उंडवडी 1 अशी गावनिहाय आकडेवारी आहे. 

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 10 वर्षे ते 63 वर्षे वयाचे वृद्ध असून कोरोना पॉझिटिव्ह अलेल्यांमध्ये 13 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे.