दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील यवत, केडगाव, राहू, कानगाव, बोरीपार्धी या पाच गावांमध्ये 11 कोरोना बाधित रुग्ण आढळळून आले आहेत.
यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यवत 2, केडगाव 4, राहू 2, कानगाव 2, बोरीपार्धी 1, असे 11 रुग्ण आढळून आले. यामध्ये 7 वर्षांपासून ते 53 वर्षांपर्यंतच्या जेष्ठांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 9 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. एकूण 47 जणांचे स्वॅब सॅम्पल प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.