केडगाव, यवत, राहु मध्ये पुन्हा कोरोना रुग्ण वाढले, आज 12 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

दौंड तालुक्यातील केडगाव, यवत, राहु, कासुर्डी आणि बोरीऐंदी या पाच गावांमध्ये पुन्हा 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 105 स्वॅब टेस्ट घेऊन ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये केडगाव 3, यवत 4, राहु 3, कासुर्डी 1, आणि बोरीऐंदी 1 असे तब्बल 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. 

यवत, केडगाव, राहू येथे कोरोना रुग्ण घटत असल्याचे दिसत असताना पुन्हा नव्याने या गावांमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याने येथील नागरिकांच्या चिंताही वाढूलागल्या आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असून त्यांचे वय हे 09 वर्षे ते 75 वर्षे दरम्यान असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.