बोरीपार्धी, राहू या दोन गावांमध्ये ‛कोरोना’चा उच्चांक, 9 गावांमध्ये 17 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये आज आलेल्या अहवालानुसार 9 गावांतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यवत ग्रामिण रुग्णालयाकडून 24 सप्टेंबर रोजी एकूण 72 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. या 72 पैकी 19 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अलेल्यांमध्ये वाळकी -1, खामगाव -1, राहू -6, खुटबाव -1, यवत -1, पारगाव -1, बोरीपर्धी -6, केडगाव -1, कानगाव -1 असे एकूण 17 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  9 वर्षे वयाच्या मुलापासून  ते 65 वर्षे असणाऱ्या वृद्धांचा समावेश असून यामध्ये 12 पुरुष आणि 

 07 महिलांचा समावेश असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.