दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड शहर आणि दौंड ग्रामिनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.
कोरोना बाधित रुग्ण दररोज सापडत असून दिनांक 25/9/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 65 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती त्यांचे रिपोर्ट अर्ध्या तासात प्राप्त होऊन त्यापैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 58 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.
पॉझिटिव्ह मध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.
यामध्ये दौंड शहर 5 आणि परिसरातील ग्रामिण भागात 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे वयोगट 19 ते 38 वर्ष दरम्यान आहे अशी माहिती डॉ.संग्राम डांगे
(वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, दौंड) यांनी दिली.
यवत कोविड सेंटरकडून दि. 25/09/2020 रोजी कोरोनाचे 57 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 48 जणांचे अहवाल आले असून 7 जणांचे अहवाल पेंडिंग आहेत. आलेल्या 48 अहवालामध्ये 14 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये ताम्हाणवाडी -1, कोरेगाव भिवर- 2, भांडगाव -2, यवत -3, चौफुला -1, एकेरवाडी -4, राहू -1 असे 14 जण पॉझिटिव्ह आले.
पॉझिटिव्ह रुग्णांचे वय 22 वर्षे ते 75 वर्षे दरम्यान असून यात 09 पुरुष आणि 05 महिलांचा समावेश असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली.