केडगाव : श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘PHARMA-IDEATHON 2026’ नावीन्यपूर्ण मॉडेल निर्मिती स्पर्धेत धनोशोभा फाउंडेशन संचलित श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी, वाखारी-केडगाव येथील डिप्लोमा फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत डिप्लोमा फार्मसीच्या कु. गायत्री गायकवाड व कु. प्रतीक्षा डोंबे यांनी नावीन्यपूर्ण मॉडेलचे उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल धनोशोभा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. धनाजी शेळके, सचिव सौ. राधिका शेळके, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.विकास गडधे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच प्रा.मीनल शेळके व प्रा. गायत्री देशमुख यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात, असे मत संस्थेच्या सचिव सौ. राधिका शेळके यांनी व्यक्त केले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







