Crime : पुण्यात बिल्डरवर गोळीबार, गोळीबारात बिल्डरचा मृत्यू



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

पुण्यात गर्दीच्या ठिकाणी एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून हि घटना आयुक्त कार्यालयाजवळच घडल्याने पुण्यात खळबळ मजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्तालयाच्या जवळ असणाऱ्या फुटपाथवर कामानिमित्त थांबलेल्या बिल्डरवर हा भरदुपारी 3 वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात बिल्डरचा मृत्यू झाला आहे.

या बिल्डरचे नाव राजेश हरिदास कानाबार असे असून त्यांचे काही लोकांशी जागेवरून वाद सुरू होते आणि आज त्यांची न्यायालयात तारीखही होती.

राजेश हे SBI ट्रेझरी शेजारील फुटपाथवर उभे असताना दुपारी 3 वाजता  मोटारसायकलवरून दोघेजण येऊन त्यांनी कानाबार यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते.

त्यानंतर कानाबार यांचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी काही माध्यमांना दिली. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.

गोळीबाराची घटना समजताच घटनास्थळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह अधिकारी व बंडगार्डन पोलीस दाखल होत त्यांनी तपास सुरू केला आहे.