Crime : दीड लाख वसूल करण्यासाठी ‛दौंड शहरात’ महिलेवर बलात्कार! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड शहरामध्ये दिडलाख रुपये वसूल करण्यासाठी महिलेच्या घरात घुसून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.२५/०९/२०२० रोजी दुपारी ११:३०वा. ते १२:०० वा. चे दरम्यान आरोपी महिला घरी एकटी असल्याचे पाहून म्हणाला की, मी तुला दिलेले दिड लाख रूपये मला वसुल करायचे आहे. 

असे म्हणुन त्याने महिलेला घरात ढकलुन देवुन घराचे दरवाजाची कडी आतुन लावुन घेवुन तिला अगोदर मारहाण केली. नंतर तिच्या मानेला धरून खाली पाडुन जबरी संभोग केला असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. 

त्यानुसार संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दौंड पोलीस पुढील तपास करत आहेत.