दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
शहर व परिसरातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे येथील प्रशासन समाधान व्यक्त करीत आहे.
दि. 7 रोजी येथील प्रशासनाच्या वतीने शहर व परिसरातील 118 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी फक्त 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तब्बल 113 जणांना दिलासा मिळाला आहे.
29 ते 49 वर्ष वयोगटातील 1 महिला व 4 पुरुष रुग्णांना नव्याने संसर्गाची लागण झाली आहे. शहर 2,SRP 2,ग्रामीण 1 या परिसरातील रुग्णांचा बाधित रुग्णांमध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.