आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 120 गिरण्यांचे वाटप



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

आज दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून शिवरत्न एंटरप्राईजेसचे ओनर आबा चोरमले यांच्या वतीने ५०% टक्के सवलतीच्या दरात पिठ गिरणीचे वाटप करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यातील १२० गिरणी वाटपाचा कार्यक्रम आ.कुल यांच्या हस्ते पार पडला. 

या कार्यक्रमाला भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव नाना बारवकर, भाजप तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, विकास शेलार, चंद्रकांत नातू, बोरीपार्धीचे माजी उपसरपंच सोमनाथ गडधे, शिवरत्न इंटरप्राईजेसचे आबा चोरमले व सहकारी उपस्थित होते.