Crime : सरकारी कामात अडथळा आणून पाटसच्या मंडलाधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी, एकावर गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन 

 दौंड तालुक्यातील पाटस येथे मंडलाधिकारी राजेंद्र म्हस्के यांना शिवीगाळ, दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 

दि.१३/१०/२०२० रोजी दुपारी १:३० वा. चे सुमारास मंडलाधिकारी राजेंद्र म्हस्के तसेच ऑपरेटर विजय नवनाथ खंडाळे व गणेश बाळासाहेब म्हस्के (दोन्ही रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) असे पाटस गावातील मंडल अधिकारी कार्यालयामध्ये काम

करीत बसले असताना आरोपी सुनील भीमराव खाडे हा दारू पिवून तेथे आला आणि त्याने सरकारी कामात अडथळा

आणून मंडलाधिकाऱ्यांना  शिवीगाळ, दमदाटी करत तेथून निघून गेला आहे.

हा प्रकार घडल्यानंतर संबंधित मंडलाधिकाऱ्यांनी आरोपी विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली. त्यावरून यवत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.