पवार चारिटेबल ट्रस्ट तर्फे दौंड मधील नागरिकांसाठी रुग्णवाहिका भेट
दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यासाठी देण्यात आलेल्या राष्ट्रवादी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे संपन्न झाला.
पवार चारिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने तालुक्यातील सामान्य नागरिकांकरिता ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
या प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर तसेच पक्षाचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.