पुणे : सहकारनामा ऑनलाइन
दि. 23/10/2020 रोजी शिरूर पोलिस पोलिस स्टेशन गुन्हा र नं 608 /2020 भा द वी 461,380 वरील गुन्हा दि.21/10/2020 रोजी घडला होता.
वरील गुन्ह्यात शिरूर हद्दीतील सरदवाडी येथील पुणे-नगर हायवे लगत असणारे इंडिकॅश कंपनीचे ATM मशीन हे गॅस कटरच्या साह्याने कट करून त्यातील 73,900 रुपयेची रोख रक्कम ही अज्ञात चोरट्यानी चोरुन नेले होती.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसी टीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आज दि.23/10/2020 रोजी शिक्रापूर येथे चाकण चौक येथे दोन संशयित इसम नामे १) विकास रामजी तोरकड (वय 24 वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता शिरूर मूळ रा पारोडा ता जि हिंगोली) २)सुनिल रामजी तोरकड (वय 26वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता शिरूर मूळ रा पारोडा ता जि हिंगोली) वरील इसमांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे मित्रांसोबत केल्याचे सांगितले. अशा रीतीने सदरचा गुन्हा उघडकीस आणून वरील दोन संशयिय इसमाना वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास करीता शिरूर पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले.
सदरील कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते सो तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे , एएसआय दत्तात्रय गिरमकर, एएसआय दयानंद लिमन,
पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, पोलिस नाईक जनार्दन शेळके, पोलिस नाईक विजय कांचन, पोलिस नाईक राजू मोमिन, पोलिस नाईक चंद्रकांत जाधव, पोलिस कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू वीरकर यांनी केलेली आहे