कुरकुंभ : सहकारनामा ऑनलाइन (आलिम सय्यद)
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत हॉटेल अनुराधा याठिकाणी अवैध्य रित्या देह विक्री करणाऱ्या रॅकेटचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल अनुराधा येथे वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती. सदर हॉटेलवर छापा टाकण्या अगोदर तेथे डमी ग्राहक पाठवण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी, पोलीस नाईक सचिन बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गाढवे अक्षय घोडके, राजू शिंदे, रवी काळे सुनील सस्ते, महिला पोलीस कॉन्स्टेबल हेमलता सूर्यवंशी यांनी सदर हॉटेलवर दोन पंचांसमक्ष छापा मारून हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका केली.
या महिलांपैकी दोन महिला ह्या पश्चिम बंगाल येथील तर एक महिला महाराष्ट्रीयन असल्याची माहिती समोर आली आहे. सदर ठिकाणी हॉटेल चालक दिवाकर मथु शेट्टी (वय ३४ वर्ष राहणार उडपी राज्य कर्नाटक) व डायसन डेनिस डिसूजा ( वय २७ वर्ष ) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.