केडगावमध्ये प्रसिद्ध वकिलांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, सुमारे 4 लाख 9 हजारांचा ऐवज लंपास



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी गावच्या हद्दीमध्ये एका नामवंत वकिलांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे ४ लाख ९ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. हि घटना दि. ११ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२:४५ वा ते. दुपारी २:४० वाचे. दरम्यान घडली असून या प्रकरणी अॅड.मानसिंग सर्जेराव शितोळे (वय६८, व्यवसाय वकील. मुळ रा.देवकरवाडी, ता. दौड, जि.पुणे, सध्या रा. सर्जेराव जेधे इग्लीश मेडीयम स्कुल जवळ,

बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सर्जेराव जेधे इग्लीश मेडीयम स्कुल जवळ चोरट्यांनी शितोळे यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलुप कशाने तरी तोडुन घरामध्ये प्रवेश केला. आत आल्यानंतर त्यांनी घरामध्ये लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व

सोन्याचे दागीने असा  एकुण ४ लाख ९ हजार रुपयांचा मुददेमाल चोरी करून पोबारा केला आहे.

चोरट्यांनी चोरलेल्या ऐवजामध्ये ८०,००० च्या दोन सोन्याची साखळया, ४०,००० ची एक  सोन्याची पिळया पिळयाची अंगठी,  ८०,००० च्या दोन सोन्याच्या अंगठया

तसेच लॉकरमध्ये  प्रत्येकी २०,००० एक

सोन्याची पिळयापिळयाची अंगठी, ६०,००० च्या तीन सोन्याच्या अंगठया, ८०,००० च्या दोन जोडी कानातील कर्णफुले, ५,०००/ दोन सोन्याच्या नाकातील नथा, १०,००० चे ५० सोन्याचे जिरे टाईप मनी, एक जोड चांदीच्या पट्टया ६,००० ची चार जोड चांदीची जोडवी व २५,००० रोख रक्कम असा एकुण ४ लाख ९ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी यवत पोलीस अधिक तपास करीत आहेत.