पुणे : सहकारनामा ऑनलाइन
संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना व्हायरस आता पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे समोर येत असून त्यामुळे नागरिकांनी आता अलर्ट होणे गरजेचे बनले आहे.
आज यवत ग्रामिण रुग्णालयाकडून तब्बल 46 लोकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली त्यामध्ये 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळून अलेल्यांमध्ये पाटस 10, बोरिबेल 01, रिसेपिसे 04 असे एकूण 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
याबाबत यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.