पुणे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी सोहळा हडपसर येथील नंदिनी ड्रीम्स या ठिकाणी विसावला असता इंडो जर्मन डायबिटीज क्लिनिक हडपसर येथील मधुमेह स्पेशालिस्ट डॉ. किशोर लोंढे व त्यांच्या टीमने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले.
या आरोग्यसेवा करणाऱ्या टीमने वारकऱ्यांच्या रक्तातील साखरेची पातळी, ब्लड प्रेशर, वजन चेक करून त्यावर योग्य औषधे देत सर्दी खोकला अंगदुखी ताप यावरही औषधोपचार केला. वारकऱ्यांची व्यवस्थित तपासणी करून योग्य तो औषधोपचार केल्याने वारकऱ्यांनी डॉक्टरांबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ कुलकर्णी व इतर स्टाफने सुद्धा वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीत व उपचार करण्यास मदत केली. नंदिनी ड्रीम्स मधील सदस्यांनी वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था केली होती.
ह.भ.प.बाळासाहेब म.गोडगे,ह.भ.प.विठ्ठल म.मासाळ,ह.भ.प.दिनकर. देवडकर, सुनिल माने सर,अभिजित अडागळे,नरूटे महाराज यांनी भजन सेवा केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.किशोर लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नंदिनी ड्रीम्स मधील सभासदांचे दिंडीचे अध्यक्ष मल्हारी सोडनवर यांनी आभार व्यक्त.
यावेळी दिंडीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ठोंबरे, कार्यांध्यक्ष चिमाजी नरूटे, सचिव हरिभाऊ हंडाळ, खजिनदार चंद्रकांत गडदरे, संचालक संभाजी नरूटे, शिवाजी खडके, ज्ञानदेव मेमाणे, महादेव गरदडे, मल्हारी सुळ, विणेकरी गावडे उपस्थीत होते.