पारगाव (दौंड) : पारगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विद्यमान आमदार राहुल कुल गटाच्या सौ.सुनिता विठ्ठल चितळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित उपसरपंच आणि ग्रामस्थांनी यावेळी आमदार राहुल कुल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार कुल यांनी उपसरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
सध्या पारगाव ग्रामपंचायतचे सरपंचपद हे जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात गटाकडे आहे. या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहे मात्र ग्रामपंचायत सदस्य संख्येत आमदार कुल गटाचे पारडे जड आहे. उपसरपंच निवडीवेळी पारगाव ग्रामपंचायत सदस्यांमधून आमदार राहुल कुल गटाच्या सौ. सुनिता विठ्ठल चितळकर यांचा अर्ज आला होता. अन्य कुणाचा अर्ज राहिला नसल्याने सौ.सुनिता चितळकर यांची निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.
आमदार राहुल कुल यांनी सत्कार करतेवेळी पारगावचे शहाजी हंडाळ, आनंदराव हाके, जालिंदर सूर्यवंशी, पोपट चितळकर, काकासो हंडाळ, आबा हंडाळ, विठ्ठल चितळकर आदी उपस्थित होते.