यवत मधील वाईनशॉप दुकान चोरट्यांनी फोडले, 40 हजारांचा मुद्देमाल चोरीला



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यात विविध ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात दररोज कुठे न कुठे हे चोरटे डल्ला मारत असल्याचे समोर येत आहे.

यवत ता.दौंड येथेही चोरट्यांनी वाईनशॉप दुकान फोडून यातील सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हि घटना दि.

१८/२/२०२१ रोजी रात्री १०:०० ते १९/२/२०२१ रोजी सकाळी ०६:३० च्या दरम्यान न्यु सोनल नांवचे वॉईन शॉपमध्ये घडली आहे.



चोरट्यांनी या वाईनशॉपचे शटर आणि त्याचे सेंटर लॉक तोडून शटर

अर्धवट उचकटवुन दुकानात प्रवेश करत  दुकानातील २५ हजारांची रोख रक्कम, १० हजार १७० रुपयांची १३ व्हिस्की बॉटल, ५ हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर असा ४०,१७० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याबाबत  महादेव भीमराव मोरे यांनी अज्ञात चोरटया विरूध्द फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा

दाखल करण्यात आला असून यवत पोलीस पुढील तपास करत आहेत.