दौंड : सहकारनामा
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता दौंड शहर, दौंड ग्रामिणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
आज दि. 26 फेब्रुवारी रोजी दौंड उप जिल्हा रुग्णालयात 61 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये 9 जनांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दौंड शहर 5 तर दौंड शहरा शेजारी असणाऱ्या बोरावके नगर 3, मेरगळ वाडी 1 असे ग्रामिणमध्ये 4 रुग्ण सापडले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी केले आहे.