दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला असून कोरोनाने केडगाव, पाटस आणि दौंड शहराला पुन्हा टार्गेट केले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दौंड तालुक्यातील पाटस येथे 3 जेष्ठ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून हे तिन्ही जेष्ठ नागरिक सख्खे भाऊ होते याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोळ मॅडम यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील एका भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची कोरोना टेस्ट केली असता संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आले होते.
मात्र कुटुंबातील इतर व्यक्ती या बाधेतून सुखरूप बाहेर पडल्या तर या तीन जेष्ठ भावांचा मात्र कोरोनाने मृत्यू झाला.
सध्या दौंड ग्रामीणमध्ये 44 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, मास्क परिधान करावा, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.