दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
शहर व परिसरामध्ये कोरोना चा पुन्हा फैलाव होवु लागल्याने दौंड पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र दिसत आहे, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाने शहरात विना मास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून पोलिसांनी दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे तसेच अशा बेजबाबदार नागरिकांना ताकीद देण्याची मोहीमही पोलीस राबवित आहेत.
शहर व परिसरामध्ये नव्याने कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महामारी ने आपले डोके पुन्हा वर काढले असल्याचे दिसू लागले आहे.दि.26 फेब्रु रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाने केलेल्या कोरोना चाचणीमध्ये शहर व परिसरातील 61 पैकी 9 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने प्रशासना बरोबरच दौंड करांची सुद्धा चिंता वाढली आहे.
त्यातच पाटस मधील एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोना मुळे आपला प्राण गमवावा लागला आहे, हे लक्षात घेता कोरोना चा आणखीन फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे .मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित वावराचे नियम पाळणे, विनाकारण गर्दी न करणे पुन्हा गरजेचे झाले आहे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तरीसुद्धा जे नागरिक बेजबाबदार पणे वागत विना मास्क शहरात फिरत आहेत, संसर्ग पसरविण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत अशा लोकांकडून दौंड पोलिसांनी दंड वसुली सुरू केली आहे. दि. 18 फेब्रु.पासूनच पोलिसांनी अशा कारवाईला सुरुवात केली आहे, साधारणतः 70 ते 80 लोकांवर रोज कारवाई केली जात असून 10 ते 15 हजार रुपयांचा दंड रोज वसूल केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पो. नि. नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाने सहा. पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,पो. हवा. सुरेश चौधरी,पो. अंम. अमजद शेख,शेखर झाडबुके, किशोर वाघ यांच्या पथकाने कारवाई केली.