आज 11 गावांमधील 13 जणांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील 11 गावांमध्ये तब्बल 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 2 दिवसांपूर्वी या रुग्णांची टेस्ट करण्यात आली होती त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.

दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले असून दिवसेंदिवस या भागातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे.

भांडगाव 1, दापोडी 1, गलांडवाडी 1, कांनगाव 1, कासुर्डी 1, खामगाव 2, नानगाव 1, यवत 2, पिंपळगाव 1, बोरिबेल 1 व लिंगाळी 1 असे 11 गावांमध्ये तब्बल 13 रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी पोळ मॅडम यांनी दिली आहे.

हा आकडा फक्त शासकीय कोविड सेंटर, रुग्णालयांमध्ये टेस्ट केलेल्यांचा असून प्रायव्हेट लॅबमध्ये टेस्ट केलेल्यांचा आकडा अजून समजू शकला नाही.