Accident – भरधाव ट्रकच्या धडकेने टेम्पो घुसला दुकानात



शिरूर : सहकारनामा

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भरधाव ट्रकची समोर चाललेल्या टेम्पोला  धडक बसून टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानात शिरल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये टेम्पो उलटून दुकानात घुसल्याने टेम्पो आणि दुकानाचेही नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील  शिक्रापूर – चाकण रोडवर या वस्तीजवळ अपघातातील टेम्पो आणि ट्रक हे एकाच बाजूने येत होते. त्यावेळी तेथे असणाऱ्या वस्तीजवळील  दुभाजकाच्या ठिकाणी टेम्पो चालकाने ब्रेक लावलाच पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिली.

हि धडक इतकी जोरदार होती की या धकेमुळे टेम्पो अक्षरशा रस्त्याच्या बाजूला उलटून समोरील दुकानात घुसला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून  टेम्पो आतील पत्र्याला गुंतून बसला आणि मोठा अनर्थ टळला.

 विशेष म्हणजे या टेम्पोमध्ये दोन महिला आणि टेम्पो चालकही होता. मात्र ते आश्चर्यकारकरित्या यातून बचावले.