दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सागर संदिपान शिंदे(रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी, पुणे.) असे अटक आरोपीचे नाव आहे. या बाबत दौंड पोलिसांनी अशी माहिती दिली की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून दौंड पोलिसांनी सागर या अटल गुन्हेगारास पुणे येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
तपासा दरम्यान पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल करीत गुन्ह्यात सामील असलेल्या आपल्या साथीदारांची हि नावे पोलिसांना दिली आहेत. यवत, लोणी काळभोर, बारामती, भिगवण, इंदापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातही या टोळीने अशाच प्रकारचे गुन्हे केले असून त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.
पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप. निरीक्षक विजय वाघमारे, पो.हवा. मलगुंडे, पो. कॉ. विशाल जावळे, आदेश राऊत, किरण चंदनशिवे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.