Corona – वाखारी (ता.दौंड) येथे कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू!



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील वाखारी या गावामध्ये कोरोनामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती केडगाव येथील प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित होनमाणे यांच्याकडून मिळाली आहे. 

नागरिकांनी कोरोनाबाबत योग्य ती खबरदार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात कोरोनाचे वाढत असलेले रुग्ण चिंतेचा विषय बनला असून आता कोरोनाने ग्रामिण भागातही आपले उग्ररुप दाखविण्यास सुरुवात केली आहे. एकट्या दौंड तालुक्यात सध्या कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण शंभराच्या दारात असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

वाखारीसह केडगाव, चौफुला (बोरीपार्धी) व परिसरात कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण असून नागरिकांनी गर्दी टाळणे, मास्क परिधान करणे, ठराविक अंतर ठेवणे आणि सॅनिटायजरचा वापर करणे गरजेचे आहे.

दौंड तालुक्यात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सरसावल्या असून नागरिकांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.