दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे.
एका आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडले असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि.16 मार्च रोजी पुन्हा 37 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आज 110 रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये 37 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 24 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश असून 16 रुग्ण हे दौंड शहर तर 21 रुग्ण ग्रामिण भागातील आहेत.