दौंड : सहकारनामा
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये पुणे जिल्हा ही आघाडीवर असल्याचे आणि त्यातल्या त्यात या जिल्ह्यातील दौंड तालुकाही कोरोनाच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसत आहे.
आज आलेल्या आकडेवारीवरून हे आता स्पष्ट व्हायला लागले असून आज दौंड उपजिल्हा रुग्णालयात एकूण 107 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली होती त्यापैकी 31 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 15 जण शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामिण भागातील 14 तर एस आर पी एफ चे 2 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये 22 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे.