केडगाव, यवतसह या 13 गावांतील 19 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा

यवत ता. दौंड येथील ग्रामिण रुग्णालयाकडून दि. 19/03/2021 रोजी कोविड 19 साठी एकूण 78 स्वॅब पाठविण्यात आले होते. 

पाठविण्यात आलेल्या 78 नमुन्यांपैकी आज 19 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर 59 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 15 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असून पॉझिटिव्ह रुग्णांचा वयोगट 19 वर्षांपासून 75 वर्षांपर्यंत आहे.  

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण केडगाव -2, यवत -6, देलवाडी -1, खामगाव -1, बोरिऐंदी -1, एकेरवाडी -1, पारगाव -1, हिंगणीगाडा -1,

 वरवंड -1, वडगाव रासाई-1, नानगाव -1, बोरीपार्धी -1, खुटबाव -1 अशी त्यांची गावनिहाय आकडेवारी आहे.