दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे असणाऱ्या एका लॉजवर महिलेला जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर (Rape) बलात्कार करण्यात आल्याची भयानक घटना घडली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून यात एका महिलेचाही समावेश आहे.
दौंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 24 मार्च रोजी आरोपी 40 वर्षीय महिला हिने पीडित महिलेस बचत गटाचे काम आहे असे सांगून या प्रकरणातील आरोपी विशाल रोहिदास चौधरी (वय 32 रा. मटकळापवार वस्ती खुटबाव ता.दौंड) व देविदास केरबा पवार( वय 40, रा.नाथाचीवाडी, ता.दौंड) यांनी पीडितेस संगनमताने मारुती एस क्रॉस नं एम एच 12 पी एच 1727 या गाडीमध्ये कुरकुंभ येथील महाराजा लॉजवर घेऊन गेले.
त्यावेळी यातील महिला आरोपी हिला यातील फिर्यादी यांनी तु मला येथे कोठे आणले आहे मी माझे नव-याला सांगते असे म्हणाली असता आरोपी महिलेने यातील फिर्यादीला शांत बस असे म्हणून लॉज मधील एका रूम मध्ये घेवून जावून फिर्यादीस हाताने तोंडावर मारहाण करून येथून कोठे ही जायचे नाही गप्प बसून राहा असे म्हणून ती तेथून निघून गेली.
थोडयाच वेळात फिर्यादीला गाडी मध्ये घेवून आलेले यातील आरोपी नं. 2 व 3 त्यांचे जवळ आले व त्यातील आरोपी नं. 2 हा फिर्यादी जवळ थांबला व आरोपी नं.3 हा फिर्यादीस म्हणाला की येथून कोठे ही जायचे नाही, ओरडा ओरड करायचा नाही जर केला तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम देवून त्यांने रूमचा दरवाजा ओढून घेतला व पीडित महिलेजवळ थांबलेल्या आरोपी नं.2 याने लगेच
रूमचा दरवाजा आतून लॉक करून फिर्यादी जवळ येवून फिर्यादीचे अंगाला झटू लागला त्यावेळी फिर्यादीने त्याला झिडकारले असता त्यांने फिर्यादीचे कानाखाली जोरात मारून सांगितले की मला त्या महिलेने पाठविले आहे असे म्हणून फिर्यादीस दमदाटी करून जबरदस्तीने रूम मधील बेडवर झोपवून फिर्यादीचे अंगावरील सर्व कपडे काढून तिच्या इच्छे विरूध्द जबरी संभोग (Rape) केला.
याबाबत पीडित महिलेने झालेल्या अत्याचाराबाबत दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिच्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.