– सहकारनामा
दौंड : यवत कोविड सेंटरकडून प्राप्त आजच्या अहवालात 113 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात दि.2 व 3
एप्रिलच्या अहवालाचा आज समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये केडगाव, यवत उच्चांकावर असून तालुक्यात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.
यवत ग्रामिण रुग्णालयाकडून कोविड 19 साठी दि 2 व 3 एप्रिल 2021 रोजी 315 लोकांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या 315 नमुन्यांपैकी 113 जण पॉझिटिव्ह आले तर 202 जण निगेटिव्ह आले आहेत.
याबाबतची अधिकृत माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.
दि. 2 व 3 एप्रिल च्या अहवालातील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केडगाव -10
जावजीबुवाचीवाडी -1,
देलवाडी – 1, बोरगाव – 1, यवत -11, देवकरवाडी – 1, पिलानवाडी – 1, पिंपळगाव – 1, दौंड -5
वाळकी – 1, वरवंड -3 सुपा – 2, कासुर्डी – 1, खुटबाव -2, भांडगाव – 1, पाटस – 1, भरतगाव -5, राहू – 2, राजुरी-1, तांबेवाडी -1, अशी आकडेवारी होती
तर दि.3 एप्रिल रोजीच्या अहवालामध्ये यवत -7, भांडगाव – 2, तांबेवाडी -2, रोटी -1, केडगाव -11, पडवी -2, सुपा -1, कासुर्डी -6, राहू -5,
खामगाव -1, डाळिंब -2, सहजपूर – 1,
नानगाव – 1, देलवडी -6, बोरिऐंदी -1,
देऊळगांवगाडा -2,
कुसेगाव – 1, पडवी -2, वरवंड – 9, अशी या गावांतील आकडेवारी समोर आली आहे.
नागरिकांनी मास्क वापरावे, सॅनिटायजरचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंग पाळावे आणि गर्दी टाळावी असे आवाहन यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी केले आहे.