Corona – दौंड शहर आणि परिसरात आज 78 पॉझिटिव्ह रुग्ण



– सहकारनामा

दौंड : दौंड तालुक्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. दररोज कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी बनत चालली आहे.

आज 7 एप्रिल रोजी 244 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 78 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे तर 166 जनांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 57 पुरुष असून 21 महिला आहेत.

यामध्ये दौंड शहरातील 35 जण असून 42 जण हे दौंड शहराच्या आसपासच्या ग्रामिण भागातील आहेत. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण व त्यांचा रहिवासी भाग पुढील प्रमाणे आहे…