Crime : जमीन वाटून देत नसल्याने मुलाकडून आई, वडिलांना मारहाण! माउलीने गळफास घेऊन संपवले जीवन, पाटस येथील घटना



– सहकारनामा

दौंड : 

आई, वडील जमीन वाटप करून देत नसल्याने त्यांना मारहाण करणाऱ्या मुलाच्या जाचाला कंटाळून एका महिलेने गळफास घेतल्याची घटना दौंड तालुक्यातील पाटस येथे घडली आहे. याबाबत अशोक नथुराम हळंदे (वय. 28, व्यवसाय. बिगारी काम व डेकोरोषन हल्ली रा. आळंदी ता.खेड जि.पुणे मुळ  पाटस ता.दौड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी दत्तात्रय नथुराम हळंदे (वय.26, हल्ली रा. रामनगर वारजेमाळवाडी पुणे मुळ रा. पुर्नवसन पाटस ता.दौड जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 07/04/2021 रेाजी सकाळी 8 ते  ते 8:30 वा. चे सुमारास फिर्यादी यांना त्यांच्या गावाकडे घराचे शेजारी रहाणारा मेव्हणा सदाशिव पडवळ याने तुमच्या आईने पाछपराचे स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेवुन आत्महत्या केली आहे असे कळविलेने ते ताबडतोब पाटस ता.दौड येथील घरी आले त्यावेळी त्यांची आई सौ. इंदुबाई नथुराम हळंदे (वय.70) या मयत अवस्थेत घरामध्ये होत्या. 

यावेळी अशोक हळंदे यांनी त्यांच्या मेव्हण्याला विचारपूस केली असता त्याने माहिती देताना काल दिनांक 06/04/2021 रेाजी रात्री 9 ते 9:30वा.चे सुमारास तुझा धाकटा भाऊ दत्तात्रय हा पाटस ता.दौड जि.पुणे येथे घरी आला होता. त्यावेळी त्याने मामा नथुराम सदाषिव हळंदे  व मामी सौ. इंदुबाई नथुराम हळंदे असे दोघांशी तुम्ही जमीन वाटप का करत नाही या कारणावरून त्यांचेशी भांडणे करून त्यांना शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे सांगितले. 

मलाही या अगोदर माझा धाकटा भाऊ दत्तात्रय नथुराम हळंदे याने मागील 1 वर्षांपासून माझे आई व वडील यांना आमचे वडीलोपार्जीत जमीनीचे वाटप का करत नाही या कारणावरून वेळोवेळी मारहाण करून त्यांना शिवीगाळ करून त्रास दिलेला होता. त्या त्रासाला कंटाळुन माझी आई सौ. इंदुबाई नथुराम हळंदे हिने तिचे ती रहात असलेल्या छपराचे खोलीमध्ये असणारे लाकडी मेडीस साडी बांधुन त्या साडीने गळफास घेवुन आत्महत्या केली असून त्यास त्यांचा लहान भाऊ दत्तात्रय नथुराम हळंदे हा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे त्यावरून यवत पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. 

अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमंलदार:- एस ए नागरगोजे करीत आहेत.