दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची तस्करी सरेआम सुरू आहे आणि वाळू तस्करीतून वादविवाद होऊन अनेकांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे हा सर्व प्रकार रोखण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसही सज्ज झाले असून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या बोटी पोलीस आणि महसूल पथकाकडून नष्ट केल्या जात आहेत.
अश्याच प्रकारची कारवाई आज शुक्रवार रोजी दौंड तालुक्यातील हातवळण येथे करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 27 लाख रुपयांच्या सहा फायबर / बोटी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने जागीच नष्ट करण्यात आला आहे. तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या आरोपींविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात आरोपी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदरची कामगिरी ही
पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक, जीवन लकडे, बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे तसेच आरसीपी पथकातील 9 पोलिस जवान आणि यवत पोलिस स्टेशनचे पोलीस जवान अमित यादव, दीपक यादव, संपत खबाले यांनी केली असून महसूल विभागातील अधिकारी, तलाठी, कर्मचारी यांनी कारवाईसाठी मदत केली आहे