Corona Iffect : पुढील आदेशापर्यंत दौंडशहर झाले प्रतिबंधित क्षेत्र, दौंड शहरात पोलीस आणि नगरपालिकेच्या धडक कारवाईत 52 हजार 200 रु. दंड वसूल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

करोना चा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी दौंड पोलीस व नगरपालिका प्रशासनाने नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर व बेजबाबदार नागरिकांवर कडक कारवाई  करण्यास पुन्हा  सुरुवात केली आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या शहरात  रोज  वाढत असताना सुद्धा येथील नागरिक बिनधास्त  पणे विना मास्क शहरात फिरताना आढळतात तसेच शहरात लॉक डाऊन लागू केल्या नंतरही ही काही व्यापारी दिलेल्या नियमांचे  पालन करीत नाही हे निदर्शनास आल्याने पोलीस व नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा – केडगाव आणि वरवंडमधील दोघांना कोरोनाची लागण

दौंडच्या उप विभागीय पो.अधिकारी ऐश्वर्या शर्मा(IPS),पो.नि. सुनील महाडीक हे स्वतः शहरात गस्त घालीत आहेत व लॉक डाउन ची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. त्यामुळे ऐश्वर्या शर्मा यांच्या गाडीच्या सायरन चा नुसता आवाज जरी आला तरी दिलेल्या  वेळे नंतर उघडी दुकाने पटापट बंद होताना दिसत आहेत.

दौंड शहरामध्ये 2 हजार 35 रुग्णांची कोरोना (स्वॅब) तपासणी

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉक डाउन ची अंमलबजावणी केली आहे, मात्र नियम मोडून दुकाने उघडी ठेवल्यास १२० दिवस दुकान सील करण्याचा निर्णय बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामतीमध्ये हे घेतला आहे. येथील व्यापाऱ्यांनी सहकार्य न केल्यास हा बारामती  पॅटर्न शहरात राबविण्याची नामुष्की येऊ शकते हे  येथील व्यापाऱ्यांनी लक्षात घेण्याची  आवश्यकता आहे.

आजपर्यंत नगरपालिकेने सोशल डिस्टन्स न पाळणे, विना मास्क शहरात फिरणे, अत्यावश्यक सेवेतील दुकानाव्यतिरिक्त आपले दुकान सुरू ठेवणे तसेच दुकान सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या वेळेचे बंधन न पाळणे अशा एकूण ३११ व्यापारी व नागरिकांकडून ५२ हजार २०० रु.दंड वसूल केला आहे. या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दौंड नगर पालिकेने दिला आहे.  तर मा.उपविभागीय अधिकारी यांच्या पुढील आदेशापर्यंत संपूर्ण दौंड शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी असे नगर पालिकेने जाहीर केले आहे.