कुरकुंभ : सहकारनामा ऑनलाईन(आलीम सय्यद)
– सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. या पार्श्वभूमीवर क्लीन सायन्स & टेक्नॉलॉजी कुरकुंभ या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत दौंड तालुक्यातील तीस पेक्षा अधिक ग्रामपंचायतीसह नगरपालिका सर्व शासकीय कार्यालये, रुग्णालय, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, यांना पाच हजार लिटर पेक्षा जास्त सोडियम हायपो क्लोराईड व सॅनिटाईझर हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी व फवारणीसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिले आहे.
तसेच कोणाला निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड व सॅनिटाईसर हवे असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शिवाय ते विनाशुल्क देण्यात येईल असे सांगितले आहे. या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात व इतर परिसरात अडकलेले कामगार व त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक , रुग्ण व त्यांचे नातेवाईक अश्या पाचशे पेक्षा जास्त लोकांना दररोज मोफत जेवण देण्यात येत आहे. गरजू लोकांनी कंपनीला संपर्क साधावा त्यांची अडचण दूर करण्यासास कंपनी निश्चित पुढाकार घेईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे सामाजिक कार्य कंपनीचे संचालक अशोक बुब, कृष्णकुमार बुब, सिद्धार्थ सिचकी, यांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विठ्ठल थोरात यांनी सांगितले.