दौंड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन निराधारांना आधार देत साजरा करण्यात आला. शहरातील कोणाचाच आधार नसलेल्या फीरस्त्यांना सध्याच्या बोचऱ्या थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या निराधारांना आपल्या सर्वांच्या मदतीची अत्यंत गरज आहे आणि आम्ही भारतीय म्हणून त्यांची मदत करणे आपलेही कर्तव्य आहे ही भावना मनात ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये फिरून निराधार असणाऱ्यांना ब्लॅंकेट देऊन एक वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करीत आदर्श ठेवला.








