दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे अज्ञात चोरट्याने दुकाने फोडून 15 हजारांच्या तांब्याच्या तारा चोरून चार दुकानांना आग लावली. या आगीत एकूण 45 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असून सतिष दशरथ कुसकर यांनी या बाबत यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.19 एप्रिल रोजी पहाटे 2:30 च्या आसपास
पुणे-सोलापुर हायवे रोडला हॉटेल ओम ताराचे
शेजारील फिर्यादी यांचे नागेश्वर फर्निचर नावाचे दुकान आहे. अज्ञातांनी त्या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापुन तो वाकवुन दुकानात प्रवेश केला. नंतर त्यांच्या दुकानातुन योगेश सुरेश कोंडे यांचे दुकानाचा पत्रा
कापुन त्या दुकानाच्या आत प्रवेश करून त्यांच्या दुकानातील अंदाजे 15 हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारेचे 4 बंडल चोरूले. नंतर जाताना या चोरट्यांनी फिर्यादी सतिष कुसकर तसेच योगेश सुरेश कोंडे, मारूती बाबु सातपुते आणि संजय गाढवे यांच्या दुकानाला आग लावली. या आगिमध्ये वरिल इसमांच्या दुकानाचे अंदाजे 45 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा अधिक तपास यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे हे करीत आहेत.