राज्याच्या अर्थसंकल्पात दौंडच्या आठ रस्त्यांसाठी 34 कोटी निधी मंजूर : आ.कुल



मुंबई : सहकारनामा (विशेष प्रतिनिधी)

– राज्याच्या २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पात दौंड तालुक्यातील आठ रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ३३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार अॅड.राहुल कुल यांनी दिली. या रस्त्यांच्या मंजुरीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दौंड तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे रस्ते मजबूत व्हावेत व त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार कुल यांनी अर्थमंत्री अजित पवार व  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेकडे केली होती. 

राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये दौंड पाटस वासुंदे रस्ता सुधारणा करणे – १० कोटी, पेडगाव शिरापूर हिंगणीबेर्डी मलठण रस्ता सुधारणा करणे – ७ कोटी, मलठण स्वामी चिंचोली  रस्ता सुधारणा करणे –  ४ कोटी, वरवंड कडेठाण रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करणे – ३ कोटी रुपये, पाटेठाण ते टेळेवाडी (नवलेवस्ती ते टेळेवाडी चौक) व पाटेठाण दहिटणे कासुर्डी सुधारणा करणे – १ कोटी, पाटस बिरोबावाडी गार रस्ता डांबरीकरण करणे – १ कोटी रुपये, भांडगाव खुटबाव देलवडी रस्ता सुधारणा करणे – ६ कोटी ७५ लक्ष रुपये, पारगाव खुटबाव यवत रस्त्यावर साळोबाचीवाडी येथे लहान पुल बांधणे – १ कोटी रुपये. या रस्त्यांचा समावेश आहे. रस्त्यांच्या मिळालेल्या या निधीमुळे एकंदरीतच तालुक्यातील रस्ते मजबूत होणार असून दळणवळण देखील सुखकर होणार आहे. यापुढेही कामांसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी शेवटी सांगितले.