बोरीभडक (दौंड) येथून 2 अल्पवयीन मुलांचे अपहरण, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



दौंड : दौंड तालुक्यातील बोरीभडक येथून 2 अल्पवयीन मुलांचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत एडविन विलमय नादर (वय-39 वर्शे रा.चंदनवाडी  दौंड ता दौंड जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

दि. 16/09/2021 रोजी 03/15 वाचे सुुमारास मौजे बोरीभडक, चंदनवाडी  ता. दौंड जि. पुणे येथुन फिर्यादी यांचा मुलगा नामे 1) कु.अॅरान एडविन नादर (वय-12 वर्षे 1 महीना)  2) कु.प्रणव संदिप गाडे (वय-13 वर्षे 1 महीना दोन्ही रा.बोरीभडक चंदनवाडी षिंदे काॅलनी जवळ ता.दौंड जि.पुणे) यांना कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचेतरी अमिष दाखवुन फुस लावुन पळवुन नेले आहे.

याबाबत फिर्यादी यांनी कायदेशीर फिर्याद दिली असून पोसई घाडगे यांनी गुन्हा दाखल केला आहे तर या घटनेचा अधिक तपास अंमलदार मसपोनि तावरे हे करीत आहेत.