पुणे : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील समारोह समिती व प्रताप क्रीडा मंडळ अकलूज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत चौफुला, वाखारी (ता.दौंड) येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कलाकेंद्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण राज्यभरातून 10 कला केंद्रांनी अनेक या लावणी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये न्यू अंबिका सांस्कृतिक कलाकेंद्राच्या लावण्यवतींनी आपली चुणूक दाखवून दिली.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या कलाकारांनी विविध प्रकारामध्ये पारितोषिके पटकावली. यावेळी न्यू अंबिका कला केंद्राच्या लावण्यवती प्रीती परळीकर, नर्तिका तसेच मालक डॉ.अशोक जाधव, संचालिका सौ. जयश्री अशोक जाधव यांना आमदार दिलीप सोपल, जयसिह मोहिते पाटील यांच्या हस्ते 3 लाखांचे प्रथम पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
अकलुज लावणी स्पर्धा, निकाल
प्रथम क्रमांक
१) न्यू अंबिका ग्रुप पार्टी
( चौफूला यवत )
२) अर्चना वानवडकर
पिंजरा ( वेळे )
३) कालीका ग्रूप पार्टी
( चोराखळी )
द्वितीय क्रमांक
१)शितल पूजा भुमकर,
जय अंबीका ( सणसवाडी )
२) अनिता परभणीकर,
नटरंग, ( मोडनिंब )
तृतीय क्रमांक
प्रिती परळीकर,
न्यू अंबिका ( चौफूला, यवत )
चतुर्थ क्रमांक
सुनीता शामल लखनगांवकर ,नटरंग,
( मोडनिंब )
उत्कृष्ठ लावणी अदाकारी कलावंत
प्रिती फरळीकर
उत्कृष्ठ तबला वादक निलेश डावाळे
उत्कृष्ठ ढोलकी वादक
अर्जून शिंदे
उत्कृष्ठ गायीका
कल्याणी गायकवाड
उत्कृष्ठ हार्मोनियम वादक
विकी जावळे
उत्कृष्ठ मुजरा
प्रिती परळीकर न्यू अंबिका (चौफूला )