मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लखवि याला पाकिस्तानी न्यायालयाकडून 15 वर्षांची शिक्षा



आंतरराष्ट्रीय – 

पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लखवी याला टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानच्या न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग केल्याप्रकरणी लखविला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने आज शुक्रवारी लख्वी याला ही 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईमध्ये 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लख्वी हा सूत्रधार होता. त्याच्या विरोधात लाहोरच्या पोलीस ठाण्यात दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तो विविध कारणे देऊन हे पैसे गोळा करीत होता आणि त्याचा वापर तो दहशतवादी कारवायांसाठी करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

लखवी हा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी हाफीज सईदसोबतचा मुख्य आरोपी आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तरीही तो पाच वर्षांपूर्वी  जामीनावर बाहेर येऊन बिनधास्त फिरत होता. आता त्याला झालेल्या शिक्षेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर समाधान व्यक्त केले जात आहे.