10 वी चा निकाल उद्या !



मुंबई – सहकारनामा ऑनलाईन –

विद्यार्थ्यांना हूर हूर लागून राहिलेल्या 10वी च्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तशी तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील 9 विभागात 10 वी ची परीक्षा घेण्यात आली होती.

परीक्षा घेण्यात आलेल्या विभागांमध्ये पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागाचा समावेश होता.

या स्थळांवर पाहू शकता दहावीचा निकाल

www.maharesult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com