दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसत आहे.
आज दि.9 ऑगस्ट रोजी 5 गावांतील तब्बल 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या बाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव 2, भांडगाव 2, पिंपळगाव 3, देलवडी 2, पाटस 1 अशी गाव निहाय आकडेवारी आहे.
एकूण 99 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते त्यापैकी वरील 10 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
नागरिकांनी कोरोनाबाबत जागरूक राहून तोंडाला मास्क लावूनच बाहेर निघावे, हात साबण आणि सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि समाजामध्ये वावरताना सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन शासनाकडून वेळोवेळी केले जात आहे.