दौंड : (अब्बास शेख)
२१ जून हा जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. या योगदिनाचे औचित्य साधून दौंड मधील पतंजली योग समीतिच्या योग साधकांनी सकाळी ६ ते ७ यावेळेत योगासने केली समितीचे प्रभारी राजू गजधाने यांनी ध्यान प्राणायाम आणि विविध प्रकारच्या योगाचे आसने करून सर्व योग प्रेमिंना मंत्रमुग्ध केले. तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांनी सुद्धा योगाचे धडे घेत योग दिन साजरा केला.
दौंड येथे योगदिन साजरा करताना योग प्रशिक्षक राजेंद्र गजधने यांनी, योगासने केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती कशी वाढते यावर मार्गदर्शन केले. यावेळी वैभव टाटिया, भवर धुमावत, वैभव महाराज कांबळे, अशोक गायकवाड, बाळासाहेब साळुंके, प्रताप भोसले, शेखर गोलांडे, सिद्धार्थ वाघमारे हे उपस्थित होते.
जागतिक योग दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भक्ती योग २०२५ च्या निमित्ताने अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना यावेळी योगाचे प्रशिक्षण देऊन योग दिन साजरा केला.