दौंड न्यायालयामध्ये ‘योग दिन’ उत्साहात साजरा

अब्बास शेख

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड न्यायालय येथे जागतिक योग दिनानिमित्त दौण्ड तालुका ॲड बार असोसिएशन तर्फे मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व सन्माननीय न्यायाधीश, वकील बंधू भगिनी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

दर वर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. भारतातही अनेक न्यायालयांमध्ये योग दिन साजरा केला जातो, ज्यामध्ये वकील आणि कर्मचारी योगा करताना दिसतात. आज पुणे जिल्ह्यातील दौंड न्यायालयसह मुंबई उच्च न्यायालयातही पहिल्यांदाच योग दिन साजरा करण्यात आला. शहराच्या दिवाणी आणि सत्र न्यायालयातही योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी ॲड बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड.प्रशांत गिरमकर यांनी माहिती देताना, योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि न्यायालयांमध्ये योग दिन साजरा केल्याने कर्मचारी आणि वकील निरोगी राहण्यास मदत होते. योग तणाव कमी करण्यास आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करतो, जो न्यायालयांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे.  योग ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे जी भारताच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि न्यायालयांमध्ये योग दिन साजरा केल्याने या प्रथेला चालना मिळते असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी दौंड बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. प्रशांत गिरमकर, ॲड. भोईटे, ॲड. कुलकर्णी, ॲड. माधव आवचर आदी उपस्थित होते. सर्वांना प्रताप भोसले यांनी योगाचे प्रशिक्षण दिले.