दौंड : दौंड तालुक्यातील राहु (जि.पुणे) येथे ४ गावठी पिस्टल, १ रिव्हाल्वर, १३ काडतुस असा एकुण २,९१,३०० /- रू किंमतीचा शस्त्रसाठा आणि मुददेमाल यवत पोलिसांकडून जप्त करण्यात आला असून ५ आरोपिंना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक डॉ.
अभिनव देशमुख यांनी अवैद्य बेकायदेशीर शस्त्रावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची नेमणुक करण्यात आलेली होती. सदर पोलीस
पथक राहु परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार निलेश कदम व
गुरुनाथ गायकवाड यांना बातमी मिळाली की, राहु गावचे हददीत ता.दौड जि.पुणे येथील महात्मा फुले चौक पाण्याच्या टाकीजवळ दिनेश महादेव मोरे (रा.राहु ता.दौड जि पुणे) व अभिषेक उर्फ बारकु राजेंद्र शिंदे व त्यांचे इतर तीन साथीदार हे बेकायदेशीर गावठी पिस्टल आपले कब्यात बाळगुन उभे असल्याचे समजले. ही माहिती मिळाल्याने यवत पोलीस स्टेशन कडील पोलीस पथकाने राहु गावामधील महात्मा फुले चौक पाण्याचे टाकीजवळ थांबलेल्या संशईत १) दिनेश महादेव मोरे (वय – २३ वर्षे,
रा.राहु ता.दौड जि.पुणे) २) अभिषेक उर्फ बारकु राजेंद्र शिंदे (वय – २० वर्षे, रा.भाडवाडी महात्मा फुले चौक राहु ता.दौड जि.पुणे) ३) अमोल शिवाजी नवले (वय ३० वर्षे, रा. कुंबडमळा सहकारनगर राहु ता. दौड जि.पुणे) ४) सचिन शिवाजी चव्हाण (वय २३ वर्षे, रा. मारूती मंदीरा मागे राहु ता.दौड जि.पुणे) ५)
परमेश्वर दथरथ कंधारे (वय २२ वर्षे, सध्या रा.भाडवाडी राहु ता.दौड जि पुणे मुळ रा. वडीपुरी ता.लोहा जिल्हा नांदेड) यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे ४ गावठी पिस्टल, १ रिव्हाल्वर, १३ काडतुस ४ मोबाईल फोन असा एकुण २,९१,३००/- रू किंमतीचा मुददेमाल मिळुन
आला असुन सदरची कारवाई मा.डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा.राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी दौड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, पोलीस हवालदार संतोष कदम पो.ना. रामदास जगताप, पो.ना.रविंद्र गोसावी पो.ना.अजित काळे पो.ना.प्रमोद गायकवाड पो.ना.अजिक्य
दौडकर यांचे पथकाने केली असुन आरोपींवर यवत पोलीस स्टेशन गु.र.न. १९१/२०२२ भा.ह.का.क. ३ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोसई संजय नागरगोजे हे करीत आहे.