दौंड : काल दि.22 ऑक्टोबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस येथे 4 ठिकाणी घरफोडी आणि 1 ठिकाणी पडलेल्या दरोड्या प्रकरणी यवत पोलीसांनी दरोडेखोर ‛कोंबड्या पेनशिल्या’च्या टोळीतील 5’ जणांना अहमदनगर जिल्ह्यात जाऊन शोध मोहीम राबवत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.२१/१०/२०२१ रोजी रात्री ११:०० ते. दि.२२/१०/२०२१ रोजी पहाटे ०५:०० च्या सुमारास पाटस, (ता.दौड, जि.पुणे) येथील सायराबानु नुरूद्दीन शेख, (रा.कुंभारगल्ली यांच्या घरी पहाटे ०२:०० वाजता दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी संदीप आबा खंडाळे, उल्हास पंढरीनाथ वळे (जुनी बाजारपेठ, पाटस) दिनकर कानोबा खराडे व नागेश्वर सोसा. रेशनिंग दुकान अशा 4 ठिकाणी चोरी व 1 ठिकाणी दरोडा टाकण्यात आला होता.
या सर्व प्रकाराची माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार संदीप कदम यांना मिळताच तात्काळ त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन ग्रामस्थांच्या मदतीने दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यावेळी जुनी बाजारपेठ पाटस येथे पोलीस अंमलदार कदम यांनी चालाखीने सात दारोडेखोरातील एका दारोडेखोराला पकडले. त्यावेळी कदम यांच्या उजव्या पायाला त्या दरोडेखोरांनी लोखंडी पाईपने मारहाण करून ग्रामस्थांवर दगडफेक केली. तर यातील दरोडेखोर पळुन जात असतांना एका दरोडेखोराला पकडण्यात त्यांना यश आले.
दरोडा पडल्याची माहीती पोलीस अंमलदार कदम यांनी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना फोनद्वारे कळवली. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार व पाटस पोलीस चौकिचे पोलीस उप.निरीक्षक संजय नागरगोजे, सहा.फौज.जगताप तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. गुरू गायकवाड, पो.हवा. निलेश कदम, पो. ना.गोसावी, पो.ना.रासकर, पो.कॉ चवधर व इतरांनी घटनास्थळी पोचुन पकडलेल्या कोंबड्या पेनशिल्या या दरोडेखोराच्या मदतीने इतर दरोडेखोरांची माहिती घेतली. यवत पोलीसांनी माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यात जाऊन शोध मोहीम राबवत दरोडेखोर १) सुधीर उर्फ कोंबडया पेनशिल्या उर्फ स्पेशन (भोसले, रा.बेलवंडी स्टेशन) २) सौरभ चिका गव्हाण (रा.राहुरी), ३) अजय उर्फ साजन मोहन काळे, (रा. तांदळी दुमाला), ४) निलेश रविंद्र काळे, (रा, गटेगाडी, ता.पारनेर), ५) विक्रम सर्जेराव भैलुमे, (रा. आढळगाव) यांना अटक केली आहे.
या गुन्ह्याचा तपास डॉ. अभिनव देशमुख, (पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण,) अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, (बारामती विभाग,) उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.संजय नागरगोजे व इतर स्टाफ करीत आहे.