यवत पोलिसांकडून 10 ठिकाणचे हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त, 10 जणांवर कारवाई

दौंड : यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी विशेष मोहीम राबवत दारू हात भट्ट्या, जुगार अड्डे आणि मटका अड्डे यांच्यावर छापे मारून 10 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या मध्ये खामगांव, यवत, भांडगाव, राहू, दहिटणे, यवत स्टेशन, नांदूर, कानगाव या गावांचा समावेश असून यात राजनंदिनी गुडदावत, दिव्या गुडदावत, सुरेश भागचंद्र शिंदे, सुरज मिलिंद जाधव, मंगेश उर्फ पिंटू मारुती माकर, सुरेश कृष्णाजी राखपसारे, ताराबाई नानावत, सुनिल दादा नारनोर, राजेंद्र पंढरीनाथ बोराटे, इंदुबाई चौघुले या आरोपिंवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 7170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील कारवाई ही दिनांक 30/10/2022 ते दि 03/11/2022 चा कालावधीत अवैध जुगार, गावठी हातमटटी दारू विक्री करणा-या धंदयांवर विशेष मोहित राबवुन यवत पोलीस स्टेशन हददीत एकुण 10 ठिकाणी छापे टाकुन 10 आरोपीवर कारवाई करण्यात आलेली आहे व एकुण 7170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. (त्यामध्ये 54 लिटर गावठी हातमटटी, टॅगो पंच देशी दारू कंपनीच्या 90 मि.ली मापाच्या 50 वाटल्या व 180 मि.ली. नापाच्या 15 बाटल्या)

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक सो बारामती विभाग व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो दौड विभाग दौड यांचे मार्गदर्शनास्वाली चवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे यदत पोलीस स्टेशनचे १) पोलीस हवालदार ब.नं. २०८२ महेंद्र चांदणे २) पोलीस हवालदार व.नं. २०९४ जगताप ३) सहा. पोलीस फौजदार चव्हाण ४) पोलीस नाईक द.नं. २०५२ पी.आर. शिंदे ५) पोलीस हवालदार द.नं. १९२८ नितीन मोर ६) पोलीस हवालदार ब.नं. ७९८ एस. एस. लोखंडे, ७) पोलीस हवालदार ब.नं. ६५३ संतोष कदम ८) पो.ना. आर. आर. गोसावी ९) सहा. पोलीस फौजदार एस. एस. बगाडे, १०) पोलीस शिपाई ब.न. १०९३ हनुमंत खडके ११) पोलीस नाईक द.न. २३३३ अजित शिवजी काळे १२) पोलीस शिपाई ब.न.. २७४१ सागर क्षिरसागर १३) पोलीस हवालदार २०६९ अजिंक्य दौडकर, १४) पोलीस शिपाई ब.नं.
२०८२ तात्याराम अकुंश करे १५) पोलीस शिपाई ब.नं. २६५८ मारूती बाराते यांनी कारवाई केलेली असुन सदर गुन्हयांचा पुढील अधिक तपास सुरू आहे.