अब्बास शेख
– दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या केडगाव गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली यात्रा यावेळी मात्र पाहुणे आणि यात्रेकरुंनी फुलून गेलेली पहायला मिळाली.
निवडणूक आचार संहिता आणि सलग दोनवर्षे लागलेले लॉक डाउन यामुळे गेले तीन वर्ष या गावात यात्रा भरली नव्हती पण यावर्षी महादेव आणि पीर साहेबांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त शंभू महादेव मंदिरास रोशनाईने सजविण्यात आले होते तर पीर साहेबांच्या दर्ग्यावर करण्यात आलेली विद्युत रोषणाईही नागरिकांची वाह वा मिळवून जात होती.
यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो यावेळीही कुस्त्यांच्या जंगी आखाड्याची सुरुवात पारंपारिक मान असलेल्या मल्हारी माळी उर्फ मल्हारी गायकवाड यांचे नातू व केडगावचे माजी उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. यावेळी यात्रा कमिटीचे प्रमुख चंद्रकांत पाटील, आप्पासाहेब हंडाळ, मल्हारी बाबासाहेब हंडाळ, विष्णुपंत हंडाळ, माजी उपसरपंच अशोक हंडाळ,सतीश बारवकर, ग्राप सदस्य नितीन जगताप,दादा बारवकर,सुभाष शेळके,गोविंद गायकवाड,संपत हंडाळ,अतुल शेळके यांसह मान्यवर उपस्थित होते.
या कुस्ती आखड्यासाठी विविध ठिकाणावरून पैलवान आले होते. त्यामध्ये महिला कुस्तीगीर पहिलवानांचाहि समावेश होता हे विशेष. शेवटची 20 हजार रुपयांची कुस्ती आंधळगावचे पैलवान पांढरे व पिपंळगावचे पैलवान इनामके या दोघामध्ये झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटल्याने कुस्ती आखाडा आणि यात्रेची सांगता झाली. यावेळी सर्व मान्यवरांनी यात्रे मध्ये सहभाग घेऊन यात्रा उत्साहात पार पडली. ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे गावच्या वतीने यात्रा प्रमुखांनी आभार मानले.